• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, December 2, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पालकमंत्री साहेब, तुमच्या इशाऱ्यानंतरही धाराशिवच्या बसस्थानकात सुधारणा होईनात; गाड्यांना डिझेल मिळेना, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 29, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
153
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

धाराशिवमध्ये कोणावर कारवाई करणार?

आज धाराशिव बस स्थानकाची घेणार झाडाझडती

आरंभ मराठी / धाराशिव

सोलापूर आगार व्यवस्थापकावर झालेल्या तात्काळ निलंबनाच्या कारवाईचा थेट परिणाम धाराशिव एसटी विभागातही जाणवू लागला आहे. सोलापूर येथील कारवाईची माहिती समजताच धाराशिव बस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः खडबडून जागे झाले. काल संपूर्ण बस स्थानकात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली.

आज पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव बस स्थानकाला अचानक दौरा असल्याने अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड धावपळ सुरू आहे. अस्वच्छता, प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष आणि सतत येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कारवाई होऊ नये यासाठी अधिकारी-कर्मचारी अलर्ट मोडवर दिसत आहेत. अचानक सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

धाराशिव येथील आगार व्यवस्थापकाविरोधात कर्मचारी आणि प्रवासी दोघेही सातत्याने तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. बससेवा विस्कळीत होणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, प्रवाशांना दमदाटी करणे, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे असे गंभीर आरोप त्यांच्या विरोधात करण्यात येत आहेत. चार दिवसांपूर्वी डिझेलअभावी तब्बल पाच तास बस सेवा ठप्प होती.

काल शुक्रवारीदेखील २५ ते ३० फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. बसच मिळत नसल्याने काही प्रवाशांना आगार व्यवस्थापकाकडून खाजगी वाहनाने जा असा अजब सल्ला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सात महिने झाले तरी नवीन बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. कॅन्टीन चालकाला मदत करण्यासाठी जाणूनबुजून पाण्याची सोय रोखल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. कॅन्टीनमध्ये १५ रुपयांच्या नाथजल या मिनरल वॉटर बॉटलला २० रुपये वसूल केले जातात.

बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था कायम असून याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. तक्रार पेटीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक प्रवाशांनी शेकडो तक्रारी टाकल्या असून, त्या तक्रारी आगारप्रमुखांकडून केराच्या टोपलीत टाकल्या जातात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस सेवा विस्कळीत झाल्यास आगार व्यवस्थापकांना भेटण्यास सुरक्षा रक्षकांकडून मज्जाव केल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत.

त्यामुळे प्रवासी संतप्त असून व्यवस्थापकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. सोलापूर आगार व्यवस्थापकाच्या निलंबनानंतर आता धाराशिव एसटी विभागावरही कारवाईची शक्यता अधिक वाढली आहे.

धाराशिवमधील वाढत्या तक्रारी, सतत विस्कळीत होणारी सेवा आणि व्यवस्थापनातील अनियमितता पाहता, पालकमंत्री आजच्या पाहणीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#guardianminister#busstand#diesel#employees#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Next Post

स्थगिती दिलेल्या ‘त्या’ तीन जागांसाठी निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

Related Posts

शेवटच्या तासात धाराशिवमध्ये ‘या’ मतदान केंद्रावर उसळली गर्दी

December 2, 2025

आठ तासांत ‘इतके’ टक्के मतदान; भूम आणि तुळजापूर आघाडीवर, धाराशिवमधे टक्केवारी घसरली

December 2, 2025

मतदानासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेचा अचानक मृत्यू

December 2, 2025

पहिल्या सहा तासांत ‘इतके’ टक्के मतदान; तुळजापूर-मुरूम आघाडीवर,धाराशिवमधे मतदानाची टक्केवारी सर्वात कमी

December 2, 2025

पहिल्या चार तासात मतदानाला मध्यम प्रतिसाद, ‘इतके’ टक्के झाले मतदान

December 2, 2025

मोठी बातमी; नगर पालिकेची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार, उच्च न्यायालयाचे आदेश

December 2, 2025
Next Post

स्थगिती दिलेल्या 'त्या' तीन जागांसाठी निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

अंधाराला भेदण्यासाठी पेटली मशाल; खासदार- आमदारांचे नागरिकांना साकडे, अंधःकार दूर करण्यासाठी मशालीला मतदान करा

ताज्या घडामोडी

शेवटच्या तासात धाराशिवमध्ये ‘या’ मतदान केंद्रावर उसळली गर्दी

December 2, 2025

आठ तासांत ‘इतके’ टक्के मतदान; भूम आणि तुळजापूर आघाडीवर, धाराशिवमधे टक्केवारी घसरली

December 2, 2025

मतदानासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेचा अचानक मृत्यू

December 2, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group