आरंभ मराठी / भूम
एका सत्तर वर्षीय महिलेवर एका तरुणाने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील एका गावात उघडकीस आली.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, भूम तालुक्यातील एका गावातील 70 वर्षीय महिलेला (नाव- गाव गोपनीय) दिनांक 20 जुलै रोजी रात्री सहा ते साडेदहा दरम्यान गावातील तरुणाने मोटरसायकलवर बसवून घेवून जाऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच त्या महिलेला सोयाबीनच्या शेतात घेवून जावून तिच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला. पिडीत वृद्ध महिलेने दिनांक 30 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64, 351 (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.












