तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीने दिले निवेदन
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यात लुटमारी, चोरीच्या घटना वाढल्या आहेत.दिवसाढवळ्या लुटमार होत असून, तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. काही भागात चोरट्यांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, वाढलेली एकूण गुन्हेगारी रोखण्यासाठी उपययोजना कराव्यात, अशी मागणी तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. फाऊंडेशनचे प्रमुख आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मेघ पाटील यांनी यासंदर्भात आज पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेतली.जिल्ह्यात काही महिन्यापासून शहरी आणि ग्रामीण भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलिसांचा वचक नसल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी मुख्य मार्गावर धावत्या वाहनांतून चोऱ्या होत आहेत.या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मेघ पाटील यांनी पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.त्यांनी यासंदर्भात जाधव यांना निवेदन दिले आहे.
काय केली मागणी ?
तुळजापूर तालुक्यातील जवळगा येथील सरपंचावर झालेला हल्ला तसेच बारुळ येथे शेतकऱ्यांना दमदाटी प्रकरणी मेघ पाटील यांनी तेरणा युथ फाऊंडेशनच्या वतीने मेघ पाटील यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन व डीवायएसपी निलेश देशमुख यांची भेट घेतली.यावेळी तुळजापूर तालुक्यातील जवळगा, बारूळ यासह परिसरातील गावांमध्ये पोलीस प्रशासनाने रात्री पेट्रोलिंग करण्याबाबत निवेदन दिले. गेल्या काही दिवसात या परिसरात घडलेल्या घटना तसेच चोरीच्या घटनांमध्ये वाढ यामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भागात पोलीस पेट्रोलिंग करण्याबाबत मागणी केली.