आरंभ मराठी टीम / धाराशिव
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता बऱ्यापैकी वेग आला आहे. काही मतदारसंघात आठ ते दहा फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे.
या मतमोजणीनुसार 11 व्या फेरीअखेर धाराशिव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील 7937 मतांनी आघाडीवर आहेत. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राणा जगजीतसिंह पाटील दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत.
उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे प्रवीण स्वामी आघाडीवर आहेत. परंडा विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेनेचे डॉ.तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.दोघांमध्ये अवघ्या 350 मतांचा फरक आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदारांना जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे तर उमरगामध्येही जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. धाराशिव-कळंब मतदारसंघात कळंब भागातून मतमोजणीची सुरुवात झाली असून, या भागातूनही आमदार कैलास पाटील यांनी बाजी मारली आहे.
धाराशिव शहरात कोण लीड घेणार,याकडे लक्ष लागले आहे.
उमरगा मतदारसंघात प्रवीण स्वामी यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.आमदार ज्ञानराज चौगुले मागे पडले आहेत.