• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, October 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राज्य शासनाकडून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय; धाराशिवमध्ये शिवसेनेने गाढवाला घातलं ‘हे’ साकडं..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 21, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
225
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

युवासेना, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने कंत्राटी नोकर भरतीच्या अध्यादेशाची होळी

प्रतिनिधी / धाराशिव
महाराष्ट्र शासनाने बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेमार्फत भरती करण्यासाठी एजन्सींना मान्यता दिली आहे. बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या या शासन निर्णयाची युवा सेना, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गुरूवारी (दि.21) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होळी करून राज्य सरकारचा निषेध केला. कंत्राटी नोकरभरती रद्द झालीच पाहिजे, पन्नास खोके एकदम ओके, या सरकारचं करायचं काय – खाली मुंडकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या. कंत्राटी भरतीचा शासननिर्णय रद्द करण्याची सदबुद्धी सरकारला मिळो म्हणून तीन गाढवांना विनवणी करण्यात आली.

खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्था/एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देण्याचा शासन निर्णय 6 सप्टेंबर रोजी जारी केला आहे. हा निर्णय सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारा असल्यामुळे युवा सेना व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गुरूवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना युवा सेनेचे शहरप्रमुख रवि वाघमारे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या धोरणाचा निषेध करत कंत्राटी भरतीसाठी नियुक्त केलेल्या कंपन्या राज्यातील मंत्री, त्यांच्या नातेवाईकांच्या असून, त्यामुळे सदरील कंपन्यांना मान्यता देण्यात येऊ तये. तसेच शासननिर्णय रद्द न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनीही बेरोजगार तरूणांवर अन्याय करणार्‍या शासन निर्णयाचा निषेध करत सरकारने हा शासननिर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना शहरप्रमुख रवि वाघमारे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, तुषार निंबाळकर, सुरेश गवळी, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पांडुरंग भोसले, पंकज पाटील, राणा बनसोडे, नाना घाडगे, नितीन शेरखाने, राकेश सूर्यवंशी, वैभव वीर, अभिराज कदम, विक्रम पाटील, गणेश साळुंके, पांडुरंग माने, जगदीश शिंदे, संकेत सूर्यवंशी, प्रशांत जगताप, रुपेश शेटे, मुजीब काझी, सय्यद साबेर, साजीद शेख, शिवप्रताप कोळी, पृथ्वीराज देडे, शरीफ शेख, नवज्योत शिंगाडे, अरबाज शेख, किरण बोचरे, अमोल जाधव, आकाश मुंगडे, राज निकम, अविनाश इंगळे, प्रशांत बोंदर, गफुर शेख, महेश लिमये, मुकेश शिंदे, यशवंत शहापालक, पिंटू कदम, अजिंक्य राजेनिंबाळकर, निलेश शिंदे, मनोज जाधव, प्रदीप साळुंके, रोहीत भांडवले, शिरीष वाघमारे, अक्षय खळदकर, अण्णा तेरकर, अविनाश इटकर, महेश उपासे, ओंकार बांगर, शुभम डांगे, सचिन बेद्रे, अक्षय कोरे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

शंभर वर्षापुर्वीचे गणपती मंदीर; 20 लाख रुपये लोकवर्गणीतून झाला जीर्णोद्धार; सार्वजनिक उत्सवात दरवर्षी गावकऱ्यांचा हिरीरीने सहभाग

Next Post

सौंदणा अंबा येथे उभारणार बालसंस्कार केंद्र, वर्षा फाउंडेशनचा पुढाकार

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

सौंदणा अंबा येथे उभारणार बालसंस्कार केंद्र, वर्षा फाउंडेशनचा पुढाकार

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मेंढ्यांना घेऊन रोखला महामार्ग; वाशी फाट्यावर समाजाचे जोरदार आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

गॅस पाइपलाइन अपडेटच्या नावाखाली महिलेची आठ लाखांची फसवणूक; एपीके फाइल पाठवून बँक खात्यावर डल्ला

October 23, 2026
तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group