प्रतिनिधी / कळंब
मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारतातील थोर महापुरुष यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून, या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्याकडे तर तहसील कार्यालयात निलेश काकडे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची अश्लील शब्दात मानहानी केली असून, महात्मा गांधी यांच्या बद्दलही अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांची मान शरमेने खाली झुकली आहे. थोर राष्ट्रपुरुषांच्या बद्दल असे अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालायला हवा. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या भिडे प्रवृत्तीला शासनाने वेळीच आवरावे आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, समाजात सलोखा राहावा यासाठी प्रयत्न करावेत यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले, कळंब तालुका अध्यक्ष बिभीषण हजारे, संजय माळी यांच्यासह ओबीसी कर्मचारी-अधिकारी, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, जिल्हाध्यक्ष संतोष भोजने, कार्याध्यक्ष दीपक हजारे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल जाधव,सुदर्शन खुणे,शहाजी माळी, उगलमुगले, चौरे आदी उपस्थित होते.