प्रतिनिधी / नळदुर्ग
येथील बालाघाट महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि.२८) नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० कश्याप्रकारे राहणार आहे, याबाबत विद्यार्थाना मार्गदर्शन करुन केली. या रॅलीमधे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.
२९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणले आहे,या प्रणालीमध्ये १२ वर्षांचे शिक्षण तीन वर्ष अंगणवाडी पूर्व-शालेय शिक्षणासह असेल. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा अधिक सुलभ केल्या जातील आणि तथ्ये शिकण्याऐवजी मुख्य कार्यक्षमतेवर अधिक भर दिला जाईल. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षा दोनदा घेण्यास परवानगी दिली जाईल,
नवीन शैक्षणिक धोरण 2020 काय असेल?
10 + 2 ची सद्य शिक्षण प्रणाली नवीन व सुधारित 5 + 3 + 3 + 4 रचनेद्वारे अनुक्रमे 3-8, 8 -11, 11-14, आणि 14 -18 वयोगटातील परस्पर बदलली जाणार आहे,या प्रणालीमध्ये १२ वर्षांचे शिक्षण तीन वर्ष अंगणवाडी पूर्व-शालेय शिक्षणाचा असेल,दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा अधिक सुलभ केल्या जातील आणि तथ्ये शिकण्याऐवजी मुख्य कार्यक्षमतेवर अधिक भर दिला जाईल. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षा दोनदा घेण्यास परवानगी दिली जाईल.शाळांमधील शैक्षणिक प्रवाह, अवांतर क्रिया आणि व्यावसायिक प्रवाह यांच्यात कोणतेही कठोर वेगळेपणा असणार नाही.