प्रतिनिधी /धाराशिव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात 24 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजून 10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापन दिन व रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर वृक्षारोपण देखील करण्यात आले. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना पवार यांच्यावरील “लोक माझे सांगाती” ही पुस्तके भेट दिली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यावेळी म्हणाले की,आज आपल्या पक्षाचा 24 वा वर्धापन दिन साजरा करून आपण रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. पक्ष स्थापनेपासूनची आपली वाटचाल ही अतिशय अभिमानाची आहे. पक्षाच्या माध्यमातून आपण समाजातल्या सर्व स्तरांमधील शेवटच्या माणसांपर्यंत आपले नाते जोडले असून आगामी काळात ते कायम टिकण्यासाठी यापुढेही आपल्याला एकत्रितपणे कार्यरत राहावयाचे आहे.
जि प चे माजी अध्यक्ष जिवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,जिल्हा परिषद चे माजी गटनेते महेन्द्र धुरगुडे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवा नेते प्रतापसिंह पाटील, उस्मानाबाद-कळंब विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, तालुकाध्यक्ष श्याम घोगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील, शहराध्यक्ष आयाझ शेख, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर,वाजिद पठाण, युवक प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे, युवक प्रदेश सचिव मजहर शेरीकर, रोहित बागल, सा.न्याय मराठवाडा सरचिटणीस इंद्रजीत शिंदे,शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार,मनोज मुदगल, व्ही जे एन टी जिल्हाध्यक्ष संजय शेंडगे,सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतिश घोडेराव,
तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख,बालाजी शिंदे,
लीगल सेल शहराध्यक्ष ॲड.योगेश सोन्ने पाटील
लीगल सेल शहर कार्याध्यक्ष अविनाश जाधव, सा. न्याय शहर कार्याध्यक्षनारायण तूरुप, किसान सेल तालुका अध्यक्ष औदुंबर पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, युवक जिल्हा सचिव प्रवीण लाडूळकर, किसान सेल तालुका उपाध्यक्ष अरुण माने, सामाजिक न्याय महिला तालुकाध्यक्ष ज्योति माळाळे,अप्सरा पठाण,युवक शहराध्यक्ष सौरभ देशमुख,नंदकुमार गवारे,शेखर घोडके, प्रमोद वीर,पंकज भोसले,रणवीर इंगळे, विवेक साळवे,
सचिन तावडे,राजपाल दुधभाते,बालाजी तांबे,संजय कावळे,S k इनामदार,बाळासाहेब कणसे,इस्माईल शेख, रवी ठेंगाळ,राजाभाऊ जानराव,सुहास घोगरे, विकास पडवळ, विक्रम पडवळ, मनोज घोगरे आदींची उपस्थिती होती.