प्रतिनिधी / धाराशिव
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे संस्थापक समाजसेवक स्व.प्रवीण पिसाळ यांना स्मरणार्थ रविवारी तालुक्यातील सोनेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सह्याद्री ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोनेगावच्या सरपंच सुवर्णमाला पाटील, उपसरपंच प्रमोद पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
सोनेगाव व गुंजेवाडी येथील तरुणांनी रक्तदान करून प्रवीण पिसाळ यांनी सामाजिक श्रध्दांजली अर्पण केली. रक्तदान शिबीरामध्ये मनोज मोरे, अमोल जाधव , प्रमोद पवार, आदित्य लाकाळ , विकास कांबळे, अजिंक्य पाटील , सागर वायकर , सतीश सांगळे , सुधाकर सांगळे, संदीप वायकर, रोहन गोफने, बापू सुरवसे, दिनेश मोरे, जोती राम मोरे, स्वामी गेंड , दादा आरगडे, पृथ्वीराज रणखांब, सुरेश सूरवसे, बळीराम मोरे, तुषार मुंढे, विनोद माने , दादा गोफने, अक्षय गोफने , किरण माने, बापू विधाते आदी युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे व तरुणांनी केलेल्या या रक्तदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.