आरंभ मराठी / धाराशिव
नगर पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, तुळजापूरमध्ये सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी 224 मतांची लीड घेतली आहे. तुळजापुरात भाजपचे 2 नगरसेवक विजयाच्या उंबरठ्यावर आहेत तर तिकडे उमरगा येथे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड यांनी जवळपास 1 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
धाराशिव पालिकेची मतमोजणी सुरु होण्यासाठी कमालीचा विलंब होत आहे. प्रशासन अजूनही झोपेत असल्याने प्रक्रियेला विलंब होत असून, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. इतर ठिकाणी मतमोजणीचा वेग असताना धाराशिवमध्ये प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मतमोजणी सुरू होण्यासाठीच प्रचंड विलंब झाला आहे. प्रशासन झोपेत असल्याचा आरोप उमेदवार व कार्यकर्त्यांकडून होत असून, मतमोजणी केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर प्रक्रिया सुरू न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाल करावी, अशी मागणी होत आहे.












