प्रतिनिधी / तुळजापूर
कुलस्वमिनी आई तुळजाभवानीचा नगारा (चर्मवाद्य) वाजतगाजत मिरवणूकीने मंदिरात अर्पण करण्यात आला. यावेळी महंत,मानकरी, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातंग नगर येथून सायंकाळी सुरू झालेल्या मिरवणूकीची बुधवारी रात्री उशिरा सांगता झाली. नगारा बनविण्याचा मान मातंग समाजाचे विष्णू खंदारे कुंटूंबाकडे आहे.
मातंग नगर येथे महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा,मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगाऱ्याचे पुजन करून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, रत्नदिप
रत्नदिप मगर, मधुसुधन गंगणे, अजित क्षीरसागर, ऋषीकेश वऱ्हाडे, बाबासाहेब खपले आदीसह प्रक्षाळ मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळजाभवानी मातेचा नगारा बनविण्याचा मान मातंग समाजाचे विष्णू खंदारे कुंटूंबाकडे आहे. मातंग नगर येथून सायंकाळी ६ च्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक पावनारा गणपती, आर्य चौक, कमानवेस, क्रांती चौक, भवानी रोड मार्गेरात्री उशिरा मंदिरात आली. मिरवणूकीने वाजतगाजत नगारा आणण्यात आला. मिरवणूकीत आराधी, वारूवाले, हालगी वाले यांच्यासह प्रक्षाळ मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशी आहे अख्यायिका
देवीचे महिष नामक दैत्यासोबत युध्द झाले. महिषाचा देवीने वध केल्यानंतर त्याच्या मस्तकातून दैत्य प्रगट होताना त्याच्या छातीत त्रिशुल खुपसून त्याचा वध केला. यावेळी देत्याने याचना करत आरतीच्या महिषाचे वाद्य वाजवण्याचा देवीजवळ वर मागितला. त्यानुसार जिवंत म्हशीच्या चामड्यापासून नगारा तयार करण्याची प्रथा आहे.