प्रतिनिधी / धाराशिव
तालुक्यातील रुईभर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका वनिता साळुंके यांची पदोन्नतीने केंद्रांतर्गत आंबेवाडी शाळेत बदली झाली असून, यानिमित्ताने त्यांचा शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.
रूईभर केंद्रीय प्राथमिक शाळेत वनिता साळुंके यांनी ५ वर्षे सेवा केली.विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळा विकास यातून रूईभर शाळेचा नावलौकिक वाढवला.विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी करून स्पर्धेच्या युगात कसे पुढे जावे आणि टिकून राहावे याचे मार्गदर्शन त्यांनी वारंवार केले. एक आदर्श, उत्कृष्ट शिक्षिका याचा परिचय त्यांनी आपल्या कार्यातून करून दिला. त्यांची पदोन्नतीने बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे डोळे आपसुकच पाणावले.
शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ यांनी त्यांना बदली झालेल्या शाळेवर उपस्थित होण्यासाठी जड अंतःकरणाने निरोप दिला तो क्षण खुपच भाऊक होता. याप्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक तथा प्रहार शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलदार खोंदे, बीट शिक्षण विस्तार अधिकारी जयमाला शिंदे, केंद्र प्रमुख के.एस. दुधंबे , सरपंच भगिरथ लोमटे उपसरपंच संतोष वडवले,शिक्षक संघाचे मराठवाडा विभाग अध्यक्ष विक्रम पाटील , अशोक सर्जे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुजावर सर, धीरूभाई अंबानी संस्थापक लहु लोमटे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, केंद्रांतर्गत मुख्याध्यापक शिक्षक, अंगणवाडी सेविका कार्यकर्ती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय मुख्याध्यापक पांडुरंग पवार यांनी तर आभार बोंदर यांनी मानले.