• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, April 3, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खेड येथील अफू लागवडीवर टास्क फोर्सचा छापा; १२.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार शेतकऱ्यांवर गुन्हा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 17, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने धाराशिव तालुक्यातील खेड येथे मोठी कारवाई करत अफूच्या अवैध लागवडीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण ८३ किलो अफूची झाडे जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत १२ लाख ३३ हजार ४५० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी चार शेतकऱ्यांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजे खेड, ता. जि. धाराशिव येथील काही शेतजमिनीत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अफू वनस्पतीची अवैधरित्या लागवड करण्यात आली आहे.

या माहितीच्या आधारे टास्क फोर्सने दिनांक १७ फेब्रुवारी रोजी खेड येथील गट क्रमांक १४१, १४२, १५३ व १७४ या शेतजमिनीत छापा टाकला. छापा टाकल्यानंतर संबंधित शेतजमिनीत अफूची झाडे फुल व बोंड्यासह मोठ्या प्रमाणात लागवड करून त्यांची देखभाल व देखभाल केली जात असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी पोलीस पथकाने कायदेशीर पंचनामा करून सर्व झाडे उपटून जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफू वनस्पतीचे एकूण वजन ८३ किलो असून त्यांची किंमत १२,३३,४५० रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी शेतकरी लिंबराज पांडुरंग लोमटे, रामहारी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे आणि ज्ञानेश्वर वसुदेव टकले (सर्व रा. खेड, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क) व १८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमान पुरके यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजीत टिके व निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला व हनुमान पुरके यांच्यासह टास्क फोर्सच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, युवा वर्ग नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून गांजा, अफू, ड्रग्ज यांसारख्या अंमली पदार्थांची लागवड, साठा किंवा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध कारवायांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#force#raid#Lakha#crime#against#farmers#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

Next Post

राजकारणाला कलाटणी, बहुमताचा आकडा गाठला; आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे ‘हा’ नवीन पर्याय..

Related Posts

शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून येडेश्वरी यात्रेत महा अन्नदान

April 3, 2026

कामगारच निघाला दरोडेखोर; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद

April 1, 2026

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

March 29, 2026

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील कामाची घेतली दखल

March 28, 2026

अजितदादांना जाऊन दोन महिने झाल्यानंतर सुनेत्राताई पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

March 28, 2026

श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची जोरदार तयारी; रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात

March 28, 2026
Next Post

राजकारणाला कलाटणी, बहुमताचा आकडा गाठला; आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे 'हा' नवीन पर्याय..

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा ‘गूढ आवाज’; सकाळी ८.०३ वाजता धरणी कंप झाल्याची चर्चा

ताज्या घडामोडी

शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून येडेश्वरी यात्रेत महा अन्नदान

April 3, 2026

कामगारच निघाला दरोडेखोर; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद

April 1, 2026

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

March 29, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group