आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिवच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्याला आज सकाळी (दि.३) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करत नुकतीच याबाबतची माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील
पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
२.६ रिश्टरस्केल तीव्रतेचे हे धक्के जाणवले. साधारणपणे आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले, असे देखील प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
भूकंपाचे धक्के सौम्य असल्यामुळे नागरिकांना भूकंप झाल्याची जाणीव झाली नाही. तसेच या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही.