प्रतिनिधी / धाराशिव
श्री. धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणजेच श्री बागेश्वर धाम सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री.बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीची धाराशिव जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या समितीच्या जिल्हा संयोजकपदी कळंब येथील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज पिंगळे यांचा वाढदिवस असून, त्यांना यानिमित्ताने श्री.बागेश्वर धाम यांच्याकडून गिफ्ट मिळाले आहे. समितीच्या सह संयोजनपदी धाराशिवचे धडाडीचे युवा कार्यकर्ते ओम नाईकवाडी यांची निवड झाली आहे.या समितीमध्ये जिल्ह्यातील शिवसेना,भाजपच्या नेत्यांचा समावेश असून, निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.
श्री. बागेश्र्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, श्री. धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणजेच श्री बागेश्वर धाम सरकार यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांची जिल्हा समितीवर नियुक्ती होत आहे.
सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य तुम्ही अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा आहे. ही जबाबदारी तुम्ही कठोर परिश्रमाने यशस्वीपणे पार पाडाल असा मला विश्वास आहे. या निवडीबद्दल सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
जिल्हा समितीवर यांची झाली निवड
धाराशिव जिल्ह्याच्या समितीमध्ये संयोजक अजित बप्पासाहेब पिंगळे, सरचिटणीस संजय विजयराज देवडा (जबाबदारी -अन्नपूर्ण योजना), आकाश मगर (जबाबदारी -गोरक्षण), सहसंयोजक ओम नाईकवाडी ( जबाबदारी-सभासद नोंदणी), मोहन पणुरे (जबाबदारी -धर्म वापसी), सचिन रोचकरी (सह संयोजक,जबाबदारी -सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व रक्तदान), गौतम लटके ( जबाबदारी -सामुहिक विवाह सोहळा (जबाबदारी-कन्या विवाह), सचिव नितीन होळे (जबाबदारी -समस्या मार्गदर्शन व कार्यशाळा), मनिषकुमार अशोकलाल सोनी (जबाबदारी-सक्षमीकरण उपक्रम),लक्ष्मण गोरे(जबाबदारी -आठवडा व मास संतसंग), रोहित रमेशराव कोमटवार(जबाबदारी -कॅन्सरग्रस्त सेवा व हॉस्पिटल सेवा).