प्रतिनिधी / धाराशिव
अयोध्यानगरीत प्रभु श्री रामलल्लांच्या मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त तसेच जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील कारसेवेचे पाठीराखे, हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भाजपचे नेते, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वासाठी असलेले योगदान आणि त्यांच्या एकूणच कार्याविषयी स्मरण केले. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले,80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे स्व. बाळासाहेबांचे धोरण होते. त्यानुसारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्य करत असून, त्यामुळे जनमानसात पक्षाचे स्थान अधिक भक्कम आहे. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, भाजपा सरचिटणीस इंद्रजीत देवकते, अमोल राजेनिंबाळकर, भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक,अभिजित काकडे, दाजी पवार, पांडुरंग लाटे, बप्पा उंबरे, शिवसेनेचे मागासर्गीय विभाग जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, संजय मुंडे, भीमा जाधव, प्रवीण पवार, कमलाकर दाणे, नितीन चव्हाण, अभिजित देडे, बालाजी सूर्यवंशी, दत्ता तिवारी, गुणवंत देशमुख, काका वाकुरे, आनंद भक्त, काकासाहेब खोत, प्रशांत पाटील, अमर माळी, आदित्य हंबीरे कुणाल धोत्रीकर, राजाभाऊ पवार, जयराम चव्हाण, निखिल घोडके, अक्षय माळी, अजिंक्य आगलावे, भारत शिंदे, दिनेश तुपे, गणेश जाधव, सुरज राऊत, शुभम पांढरे, लखन झिरमिरे, सौरभ निंबाळकर, अंकुश मुळे, सुमित गायकवाड, खंडू मासाळ, ओम जाधव, भाजपाचे अमोल पेठे, लक्ष्मण माने, किशोर पवार, गणेश इंगळगी, बापू सूर्यवंशी, अफसर शेख, अमित कदम यांच्यासह महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.