हजारो येडेश्वरी भक्तांनी घेतला लाभ
आरंभ मराठी / कळंब
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी येडेश्वरी यात्रेनिमित्त येणाऱ्या येडेश्वरी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्नछत्र उभारले होते .या अन्नछत्राचा रखरखत्या उन्हामध्ये अनेक भाविकांनी लाभ घेतला . यावेळी बाराशे किलो खिचडीचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी येरमाळा येथे येडेश्वरी यात्रेनिमित्त राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून येडेश्वरी भक्त येत असतात. या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री पिंगळे यांच्याकडून दरवर्षी अन्नछत्र उभारले जाते .यावर्षी देखील येरमाळा येथे हे अन्नछत्र उभारले होते. या अन्नछत्राच्या माध्यमातून रखरखत्या उन्हात सर्व येडेश्वरी भक्तांना गरम, ताजे व स्वच्छ खिचडी वाटप करण्यात आले.
गेली अनेक वर्षापासून जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्याकडून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे समजून अन्नदानाचे सेवाकार्य केलं जात आहे. केवळ येडेश्वरी यात्रेतच नव्हे तर आषाढी एकादशीनिमित्त कळंब शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या शेकडो वारकरी दिंड्यांसाठीही साबुदाणा खिचडी व अन्नदानाची व्यवस्था केली जाते.
या माध्यमातून सामाजिक सेवेची परंपरा जपली जात आहे.त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल येडेश्वरी भक्तांनी समाधान व्यक्त केले.
या खिचडी वाटपासाठी कळंब धाराशिव तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








