प्रतिनिधी । शिराढोण
एका गुन्ह्याचा जलदगतीने तपास करत कळंब तालुक्यातील शिराढोण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली आहे. या कामगिरीबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथील विठ्ठल आत्माराम सौदागर यांचा 24 लाख रुपये किंमतीचा जेसीबी गोविंदपुर येथील पेट्रोल पंपावरुन 8 ऑगस्ट रोजी रात्री
अज्ञातांनी पळवला असल्याची फिर्याद 11 तारखेला शिराढोण पोलीस ठाण्यात दिली होती. फिर्याद देताच येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास कार्य सुरु केले. सदरील गुन्हयात तपास पथक तयार करुन या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर, पोलीस कर्मचारी दयानंद गादेकर, मनोज मरलापल्ले, श्रीकांत लाकाळ, निळकंठ गवळी, किरण देशमाने यांनी अतिशय कुशलतेने तपास करत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत घागरवाडा ( ता.धारुर) येथून चोरीस गेलेल्या जेसीबीसह आरोपी जालिंदर गोविंद खाडे यांस तब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले जात आहे.