प्रतिनिधी / शिराढोण
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे शुक्रवारी सायंकाळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निधीतून तसेच आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून व अन्य योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिराढोण गावात शाळा, मंदिर, दर्गा, समशानभूमी संरक्षण भिंत, काशिनाथ महाराज मठ, आरोग्य केंद्र, मंदिर सभामंडप, दलित वस्तीतील सभागृह, देवधानोरा- इकुरगा-जायफळ रस्ता तसेच कोल्हेगाव-शिराढोण-आवाडशिरपूरा रस्ता अशा विविध कामांच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातूनच काही विकासकामे मार्गी लागली असून काही पूर्णत्वास जात आहेत.या व्यतिरिक्त इतरही बऱ्याच कामांना मंजुरी मिळाली असून ती कामे प्रत्यक्ष सुरु होण्याच्या मार्गांवर आहेत.
गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून, यापुढेही विविध योजनेतून निधी उपलब्ध करुन गावाचा आर्थिक, सामाजिक व व्यापारवाढ यासाठी कायम साथ देणार असल्याचे खासदार व आमदार यांनी जाहीर सभेद्वारे गावकऱ्यांना संबोधित केले.
यावेळी धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जिल्हा संघटक प्रा. दिलीप पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रदीप मेटे, माजी जि. प. सदस्य बालाजी जाधवर, माजी पं .स.सदस्य राजेश्वर पाटील, उत्कर्ष संगवे, माजी प. स. सभापती रामलिंग आव्हाड, सलीम उर्फ सैलानी बागवान, नासेर पठाण,बाजार समिती सदस्य हनुमंत आवाड, संजय होळे, सुधाकर टेळे, रफिक कुरेशी,अशोक उर्फ सोनू यादव, दिलीप पांनढवळे, धनंजय माने, श्रीकांत भिसे, सचिन कापसे, राजाभाऊ आगरकर, संदीप पालकर, हनुमंत पाटील, मनोहर धोंगडे, विश्वजीत जाधव, गोविंद चौधरी, अतुल पवार, अजित घोगरे, महादेव मगर,पृथ्वीराज लोमटे, श्रीपाद कापसे, अवधूत पाटील, आयुब कुरेशी, अमोल पाटील, निलेश नाईकवाडे, किरण सहाने, विक्रम नाईकवाडे, राजाभाऊ खडबडे , दगडू पाटील, जगदीश राठोड, भरतराजे शिंदे, प्रज्योत माने आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
यांचा झाला पक्ष प्रवेश
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात खासदार व आमदार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश घेतला. यामध्ये ऍड. नितीन पाटील, सिकंदर कुरेशी, सलमाम बडे, पाशा पठाण, मंजूर कुरेशी, शौकत शेख, बिलाल पठाण यांच्या सह या गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.