अमोलसिंह चंदेल / शिराढोण
श्री गणेशाला आज निरोप दिला जात आहे. सगळीकडे उत्सवाची धामधूम सुरू आहे. पण या काळातही काही मंडळे सामाजिक उपक्रमांतून आपलं वैशिष्ट्य जपत आहेत. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील वेगवेगळ्या गणेश मंडळाकडून सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या 30 वर्षांपासून दरवर्षी सातत्याने उपयुक्त सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्री.विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळाने यावर्षी दहा कुपोषित बालक दत्तक घेऊन आपला सामाजिक कार्याचा वारसा कायम जपला आहे.त्यामुळे मंडळाचे कौतुक केलं जात आहे.
श्री गणेशाच्या मिरवणुकीचा पारंपारिक व सांस्कृतिक ठेवा जपत समाज व परिसराशी आपली असलेली सामाजिक नाळ पक्की करत गेली तीस वर्षापासून शिराढोण (ता. कळंब) येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे व नाविन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवून परिसरातील गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले श्री विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ शिराढोणचा राजा तीस वर्षापासून प्रत्येक वर्षी गणेश भक्त मंडळास श्री ची मूर्ती भेट देतात. नवसाला पावणारा म्हणून नावलौकिक असलेल्या मंडळाने याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव साजरा करत आपल्या सामाजिक कार्यातून वेगळी छाप निर्माण केली आहे.
गेल्यावर्षी 15 क्षय रूग्णांची घेतली होती काळजी
शिराढोण येथील महाजन गल्ली येथील गेल्या तीन तपापासून मंडळाचे सामाजिक उपक्रमात सातत्य आहे. यात प्रामुख्याने गतवर्षी क्षयमुक्त गाव करण्यासाठी मंडळांनी वर्षभरासाठी 15 क्षयरुग्ण दत्तक घेऊन त्यांची पोषण आहार किट जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ.अन्सारी यांच्या हस्ते पोषण आहार किट वाटप करून प्रारंभ केला होता. या अविरत कार्याची दखल घेत डॉ. अन्सारी यांनी मंडळास भेट देऊन यावर्षी निश्चय मित्राचा व मंडळाचा सत्कार केला. हीच परंपरा कायम ठेवत गावातील अंगणवाडीतील 10 कुपोषित बालकांना वर्षभर पोषक पोषण आहाराचे किट अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षक श्रीमती बोराडे मॅडम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सामाजिक उपक्रमांची शृंखला
मराठवाडा मुक्त करण्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांची ओळख व त्यांचे कार्य जनजागृतीच्या माध्यमातून सांगण्यात आले. स्त्री भ्रूणहत्या, पाणी जिरवा पाणी आडवा, सेंद्रिय शेती काळाची गरज, महापुरुष क्रांतिकारक यांचे माहिती देणारे पोस्टर, व्यसनमुक्त जनजागृती असे डिजिटल सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले, गावातील स्वच्छता कामगारांचा सत्कार करून सफाई दिन साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी हॉलीबॉल किट देण्यात आले, महिलांना व्यासपीठ उखाणे स्पर्धा, स्मार्ट सुनबाईच्या माध्यमातून भारत देशातील कर्तुत्वान महिलांची ओळख करून दिली, सेंद्रिय शेती काळाची गरज स्वयं शिक्षण प्रयोग धाराशिवच्या प्रियाताई राखुंडे जनजागृती केली. महिलांना शेती पूरक उद्योगासाठी बँक अधिकारी संवाद सत्र आयोजन केले. 350 वी राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून अठरापगड समाजातील सहकुटुंब प्रतिनिधींना श्रीची सामुहिक समरसता आरती घेण्यात आली.
पारितोषिके मिळाली,प्रशासनाकडून कौतुकाची थाप
मंडळांनी घेतलेल्या स्पर्धेतील स्पर्धकांना एक व्यक्ती एक वृक्ष म्हणून ३५० केशर आंबा वृक्ष देण्यात आले. लघु तरुण उद्योजक यांचा वृक्ष देऊन संतोष राऊत (कौशल्य आयुक्त महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पशुसेवा म्हणून जंत निर्मूलन शिबिर पशुवैद्यकीय अधिकारी शिराढोण डॉ.कांबळे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. मंडळ घेत असलेल्या उपक्रमाची प्रशासन दखल घेत आहे.म्हणूनच 2008 व 2012 मध्ये शिराढोण पोलीस स्टेशन प्रथम मानांकन दिले. 2009 मध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 21000 देऊन सन्मानित करण्यात आले. या रकमेतून मंडळाने सार्वजनिक ठिकाणी कूपनलिका घेतली. या कार्याची दखल घेवून डॉ. हेडगेवार स्मारक सेवा समिती पुणे यांनी उपनेलिकेचे पाणी साठवण्यासाठी पाच हजार लिटरची टाकी भेट दिली. त्याचा फायदा गावातील सर्व नागरिकांना होत आहे. यावर्षी श्रीची मिरवणूक गुलाल मुक्त करून पुष्पवृष्टीने व पारंपारिक वाद्याने व चांद्रयान ३ देखाव्याचे सादरीकरण करत श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्याचे नियोजन आहे.
यांनी घेतला पुढाकार
मंडळाच्या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे मार्गदर्शक चंद्रकांत महाजन, गणेश महाजन,( ग्रामपंचायत सदस्य), विजयकुमार महाजन, नितीन आबा पाटील, दत्तप्रसाद माकोडे,रमण मुंदडा,जनार्दन महाजन,पांडुरंग महाजन, दत्ता महाजन, धनराज महाजन, राहुल महाजन, राजाभाऊ महाजन, सचिन परदेशी, किशोर महाजन, मुन्ना महाजन,अनिकेत महाजन, स्वप्निल महाजन, अशोक महाजन, नितीन गायकवाड, बालाजी गुमानी, बालाजी साळुंखे, नितीन महाजन, रुपेश नान्नजकर,अध्यक्ष रंजीत महाजन, उपाध्यक्ष संदीप गायकवाड,कोषाध्यक्ष ओम डावखरे,रोहित महाजन, क्रीडा अध्यक्ष ओमकार महाजन , लक्षदीप गुमाने, कृष्णा नान्नजकर वैभव ,नान्नजकर, अभिषेक धाकतोडे, दत्ता खोडसे, ज्ञानेश्वर महाजन, गोविंद महाजन, साहिल महाजन, शुभम महाजन, अजय सुरवसे, सागर शिंदे , कृष्णा पांचाळ, किशोर पांचाळ , ऋषी पवार आधीसह शेकडो कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. महिलाविषयी कार्यक्रमाचे नियोजन नंदाताई धोंडीराम महाजन (सोसायटी सदस्य), सौ ज्योती महाजन (ग्रामपंचायत सदस्य), अनिता महाजन, प्रिया महाजन, रचना महाजन, कविता महाजन, आशाताई यादव, निशा महाजन, आशा महाजन, राजश्री महाजन, अश्विनी नानस्कर, स्नेहल चंदन, दिव्या नानस्कर, अनुजा नमस्कार यांनी पाहिले, अशी माहिती मंडळाचे सदस्य सुरेश महाजन यांनी दिली.