विज्ञानामुळेच सर्जनशीलता वाढीस लागते, शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी यांचे मत
प्रतिनिधी / कळंब
विज्ञानामुळेच विद्यार्थ्यांच्या अंगी सर्जनशीलता वाढीस लागते व त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि नवनवीन संकल्पना सुचतात. त्यामुळे आजच्या पिढीने वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबिने आवश्यक असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी यांनी व्यक्त केले.
कळंब येथील वेद शैक्षणिक संकुलात राज्य विज्ञान संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव स्पर्धा पार पडली.या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून प्रा.सतिश मातने,अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी हे होते.तर यावेळी धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष रामकिसन गायकवाड ,तालुकाध्यक्ष राम शेळके ,तालुका कार्याध्यक्ष परमेश्वर पालकर ,केंद्रप्रमुख पांडुरंग गामोड ,केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव उपस्थित होते .सुरुवातीला माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना फुलारी म्हणाले की विज्ञान नाट्य महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच पण सोबत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो.
त्यामुळे भविष्यातील एक सजग नागरिक निर्माण होतो
यावेळी प्रा सतीश मातने यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र स्वामी यांनी केले तर सुत्रसंचालन रामकिशन गायकवाड यांनी केले तर आभार परमेश्वर पालकर यांनी मानले.
या नाट्य महोत्सव स्पर्धेचे परीक्षक म्हणून परमेश्वर पालकर ,डॉ.पल्लवी उंदरे व नाट्यशास्त्र विभाग उपकेंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ धाराशिवचे श्री.शिंदे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत तालुक्यातील आठही तालुक्यातील एक संघ सहभागी झाला होता.भूम तालुक्यातील श्री गुरुदेव दत्त हायस्कूल हा संघ विभाग स्तरासाठी पात्र ठरला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाना आंबा या संघाने उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस मिळवले.या बदल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.