प्रतिनिधी / धाराशिव
दिल्लीतील ‘नॅशनल अक्रेडेशन बोर्ड फाँर हॉस्पिटल अँन्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर’ च्या’वतीने देण्यात येणारे ‘एनएबीएच’ मानांकन धाराशिव येथील ‘सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्स’ प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजवर ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त झालेल्या रुग्णालयांच्या रांगेत आता ‘सह्याद्री’ चा देखील समावेश झाला आहे.
विविध अद्ययावत वैद्यकीय सोयी-सुविधांसह प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी वर्गामुळे ‘सह्याद्री’ हॉस्पिटल ला मानांकन प्राप्त झाले आहे. अद्ययावत उपचारांची सुविधा हा ‘एनएबीएच’ मानांकनासाठीचा अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या संचालिका स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ.वसुधा दिग्गज दापके-देशमुख यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या ”एनएबीएच’चे मानांकन मिळविण्यासाठी त्यांचे काही निकष पाळावे लागतात. त्यामध्ये रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा अद्ययावत आहेत का, डॉक्टरांसह कर्मचारी वर्ग क्लालिफाईड व प्रशिक्षित आहे का, याची पाहणी केली जाते; तसेच रुग्णालयातील रेकॉर्डचीदेखील तपासणी करण्यात येते. रुग्णाला उपचारापूर्वी त्याच्या खर्चाची माहिती दिली जाते का आणि रुग्णांचे समुपदेशन केले जाते का, असे विविध निकष ठरविण्यात आले आहेत. मानांकन प्राप्त होण्यासाठी त्यांची पूर्तता करणे गरजेचे असते. आमच्या रुग्णालयाने सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच आम्हाला ‘एनएबीएच’ मानांकन मिळाले आहे.’