प्रतिनिधी / धाराशिव
पावसाअभावी वाळणाऱ्या खरिपाच्या पिकांना दिलासा देत गुरुवारी सायंकाळी धाराशिव शहरासह ग्रामीण भागात दमदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी सायंकाळी घरोघरी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात गौरीचे आगमन झाले. त्यानंतर वरुणराजाचेही जोरदार आगमन झाले.
यावर्षी सुरुवातीपासून पावसाने ओढ दिली असून, त्यामुळे खरिपाची पिके वाया जात आहेत. ऑगस्ट महिन्यात पाऊसच न झाल्याने पिके करपण्याच्या मार्गावर होती. काही प्रमाणात पिके वाळूनही गेली आहेत. गेल्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र पून्हा कडक ऊन पडल्याने पिके माना टाकू लागली होती. गुरुवारी सायंकाळी धाराशिव शहरासह ग्रामीण भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही वेळेतच पाणी पाणी झाले होते.जिल्ह्यातील पाणीसाठे कोरडे पडत आहेत, त्यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
छायाचित्र; मुकेश नायगावकर, धाराशिव