प्रतिनिधी / धाराशिव
विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेची काळजी घेणाऱ्या, नियमांचे पालन करणाऱ्या आणि जनजागृती करणाऱ्या तसेच पदाधिकारी सदस्यांच्या अडीअडचणीमध्ये सदैव तत्पर असलेल्या धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेची ताकद आणखी मजबूत झाली आहे. या संघटनेत उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांचे धाराशिव जिल्हा संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतुक संघटनेतील दत्तात्रय वसंत गवाड, दिलीप देशमुख, पप्पू शिनगारे, दत्ता वैद्य, गोरख जाधव,दिगंबर वाघमारे, गोविंद घोडके, आनंद यादव, ज्ञानेश्वर घोगरे, अमित थोरात या पदाधिकारी व सदस्यांनी धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेत प्रवेश केला. धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष गोपाळ शिंदे, उपाध्यक्ष नवनाथ बारकुल, सचिव दादासाहेब गवळी तसेच सर्व पदाधिकारी व सभासद यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.यापुढेही एकीने राहून संघटनेचे कार्य, विचार वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे उपाध्यक्ष व लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संस्थापक सल्लागार श्रीकृष्ण पाडे यांचे मार्गदर्शन लाभले.