आरंभ मराठी / धाराशिव
एकनिष्ठ तसेच कोणत्याही लोभाला बळी न पडता पाच वर्षात जनसेवेत कार्यरत राहिलेले आमदार कैलास पाटील आज सोमवारी सकाळी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालच एका शेतकऱ्याने 10 हजारांच्या मदतीचा धनादेश दिला. त्यांनी या शेतकऱ्याचे आभारही मानले. एकीकडे निवडणुकीत उमेदवाराकडून पैशांची अपेक्षा केली जाते. मात्र, धाराशिव मतदारसंघात नेमकं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. आमदार कैलास पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क, कामाचा धडाका, पक्ष निष्ठेमुळे वाढलेला जनतेचा विश्वास, यामुळे त्यांच्यावर जनतेचे निस्वार्थ प्रेम असल्याची प्रचिती येते.
अत्यंत कठीण काळात काम
शिवसैनिक म्हणतात,गेल्या कित्येक वर्षात या मतदारसंघात एक मोठी संधी चालून आली आहे. सामान्य घरातून आलेले एक नेतृत्व पुन्हा एकदा आमदार होणार असल्यामुळे ही बाब आपल्यासाठी नक्कीच भूषणावह आहे. या पदाचा जनसामान्य जनतेला गेल्या पाच वर्षात फायदा झाला आहेच पुढेही होणार आहे. कोरोना काळात म्हणजे अत्यंत कठीण काळात आमदार कैलास पाटील यांनी आपल्या सामान्य जनतेची काळजी घेतली. त्यांनी एक सुसज्ज शासकीय महाविद्यालय उभे केले.
मोठ्या संख्येने उपस्थित रहा
खोके व मंत्रीपदाच्या पायघडया टाकल्या त्यावेळी या नेत्याने स्वाभिमानी बाणा दाखवत जनतेशी इमान राखण्याचे काम केले. आता जबाबदारी आपल्यावर आहे ज्या आमदारांनी खोके व मंत्रीपदाला लाथ मारली, त्या प्रामाणिक माणसाला साथ देण्याची वेळ आली आहे. सामान्य घरातील हक्काचा आमदार यांना साथ देण्यासाठी आपण सर्वानी सोमवारी (ता. 28) रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
असा आहे रॅलीचा मार्ग
धाराशिव-कळंब विधानसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास पाटील सोमवारी सकाळी भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची रॅली सकाळी १०:०० वाजता अहिल्यादेवी होळकर चौकातून सुरू होईल.अण्णाभाऊ साठे चौक-धारासूर मर्दिनी मंदिर- हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा – नेहरू चौक-काळा मारुती मंदिर-संत गाडगे बाबा चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, असा रॅलीचा मार्ग असेल.