प्रतिनिधी / कळंब
तालुक्यातील बोरगाव येथील राणी हनुमंत माळी. एखादी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळविणारी गावातली पहिलीच मुलगी.तिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि गावकऱ्यांना ऊर अभिमानाने भरून आला.गावकऱ्यांनी तिचा आणि तिच्या आई वडिलांचा यथोचित सन्मान केला. गावातून एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणारी ही पहिलीच सावित्रीची लेक असल्याने गावकऱ्यांना मोठा आनंद झाला.
अशिक्षित शेतकरी कुटुंबातून आलेल्या राणीने अथक परिश्रम,प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, संयमाच्या जोरावर मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी असल्याची भावना गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे. राणीने आणखी वेगवेगळ्या परीक्षा दिल्या आहेत. त्याचे निकाल येतील तेव्हा प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी हनुमंत माळी यांना पाच मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपल्या हुशार मुलीला दिलेल्या पाठबळाने तिने अखेर एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून ओबीसी महिलांमध्ये राज्यात 33 वा क्रमांक मिळवला .
बोरगाव बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे मनोज माळी, शंकर कांबळे,किरण मस्के, सरपंच दत्ता थोरात, उपसरपंच प्रभाकर पाटील, पोलीस पाटील पांडुरंग मस्के, अंगणवाडी सेविका सुषमा वाघमारे,सुमित्रा भोजने,मुख्याध्यापक श्री उकिरडे, सहशिक्षक श्री पाखरे, झेलेवाड,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विठ्ठल मासाळ,माजी सरपंच सुभाष रणदिवे, व्यंकट खांडेकर,विनोद गाढवे, अतुल माळी, अनिल माळी ग्रामपंचायत सदस्य उषा माळी,मंगल माळी, पार्वती माळी व राणीचे मामा व्यंकट माळी यावेळी उपस्थित होते.