• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Martha Reservation कुणबी संदर्भात धाराशिवच्या समितीला हैद्राबादमधून मिळाले महत्वाचे दस्तावेज, तत्काळ निर्णय घ्या

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 22, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणप्रश्नी हैद्राबाद गॅझेटीयरच्या अनुषंगाने धाराशिवच्या जिल्हा समितीने घेतलेल्या मेहनतीला मोठे यश आले आहे. या समितीच्या दोन वेळा झालेल्या तपासातून तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन केंद्रातून महत्वाचे दस्तावेज उपलब्ध झाले असून, या कागदपत्रांचा कुणबी नोंदीच्या अनुषंगाने मोठा उपयोग होईल,असा विश्वास व्यक्त करत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे.आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या समितीच्या नेमणुकीसाठी तसेच दस्तावेज उपलब्ध करून ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा केला होता.

धाराशिव येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या समितीने दुर्मिळ दस्तऐवजामधून अनेक महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून घेतली आहेत. तज्ञांकडून त्याचा सर्वांगाने अभ्यास सुरु आहे. कोणावरही अन्याय न करता मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयायासाठी राज्य सरकारला त्यातून मूलभूत पुरावे उपलब्ध होतील असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर निर्णय घ्या – आमदार पाटील
आमदार राणा पाटील यांनी म्हटले आहे की, मागील सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असून, याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटचे महत्व विचारात घेऊन जेष्ठ विधीज्ञ, मनोज जरांगे पाटील यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अशी विनंती केली आहे.तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत देखील याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
योग्य मार्ग निघेल
उपलब्ध झालेल्या दस्ताऐवजात हैद्राबाद गॅझेटीयरसह इतर अनेक कागदपत्रांचाही समावेश आहे. जेष्ठ विधीज्ञ तसेच मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे-पाटील यांच्याशी संबंधित कायदे सल्लागार यांच्यासह याबाबत आढावा बैठक आयोजीत केल्यास यातून योग्य कायदेशीर मार्ग निघण्यास सहकार्य होईल. त्यानुसार आढावा बैठक आयोजित करण्याची आग्रही विनंती आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
समितीमध्ये जाणकार मंडळी
आपल्या सूचनेनुसार कुणबी नोंदीचे दस्तावेज शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली होती. या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह, तहसिलदार, मोडी व उर्दू लिपी जाणकार, तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी बुवा यांच्यासह स्थानिक युवकांनाही समाविष्ट करून घेण्यात आले होते.

समितीने दोनवेळा घेतला शोध

दोन वेळा या समितीने हैदराबाद येथील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन केंद्रातील निजामकालीन कागदपत्रांचा धांडोळा घेऊन अनेक महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून आणली आहेत, ज्याचा राज्य सरकारला न्यायालयीन पातळीवर देखील मोठा लाभ होऊ शकतो असा विश्वास आहे. पहिल्या भेटीतील कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत या बाबींचा आढावा घेणार आहे.

तरुणांनो, टोकाचे पाऊल उचलू नका
तरुण बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये
धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ व पाटोदा येथील शिवाजी निलंगे या युवकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नाराजीतून आत्महत्या केली आहे. त्यामुळे मिसाळ आणि निलंगे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे. लवकरच आशादायक निर्णय येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील तरुणांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलून कुटुंबातील सदस्यांना दुःखाच्या खाईत लोटू नये,असे विनम्र आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Tags: #commaharashtra #eknathshinde #devendraphadanvis #ajitdadapawar
SendShareTweet
Previous Post

Tuljabhavani Temple तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नवरात्रोत्सव पत्रिकेत प्रथमच घडला असा प्रकार, तुळजापूरकर संतप्त

Next Post

MMlBY मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

Related Posts

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

Vidhan Parishad Award मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी विधान परिषद गाजवलेल्या माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार

September 4, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची निवड; अभिनंदनाचा वर्षाव

February 22, 2024

अनोखी कला, धाराशिवच्या कलाकारांनी पेन्सिलच्या टोकावर दोन तासांत साकारले प्रभू श्रीराम; मोदींना भेट देण्याची इच्छा

January 16, 2024

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य; राज्यात 10 लाख हेक्टरवर बांबू लागवड, हेक्टरी 7 लाखांचे अनुदान मिळणार

January 9, 2024
Next Post

MMlBY मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 'या' दिवशी मिळणार

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून विनोद गपाट यांची 29 लाखांची फसवणूक

May 17, 2025

भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागून ईट येथे अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

May 17, 2025

…अखेर तुळजापूरच्या जुन्या बस बसस्थानकाचा वापर सुरु, 8 कोटी खर्चूनही बसस्थानकात होता मोकाट जनावरांचा वावर,

May 17, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group