दिनेश पाटील / माडज
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सायंकाळी उमरगा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन मराठा आरक्षणावर मार्गदर्शन केले. उमरगा तालुक्यातील माडज येथे आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या किसन चंद्रकांत माने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन जरांगे यांनी सांत्वन केले.
माडज येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी माडज ग्रामस्थांशी संवाद साधला. भेट देऊन तसेच मराठा आरक्षण मिळावे यासाठी बलिदान दिलेल्या किसन चंद्रकांत माने यांच्या आई-वडील,भाऊ यांना धीर देऊन सांत्वन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा समाजाला मार्गदर्शन केले.शासन दरबारी सरसगट आरक्षण मिळावे, यासाठी पाठपुरावा चालू असून, आपला लढा शांततेच्या मार्गाने चालू आहे. सर्वांनी एकत्रित येऊन शासनाकडे शांततेमध्ये आरक्षण मागूया, असे आवाहन केले. त्यानंतर ते उमरगा येथील सभेला रवाना झाले. यावेळी चर्चा करत दिनकर पाटील, नरेंद्र माने, संतोष पाटील यांच्यासह गावातील सर्व मराठा बांधवांनी जरांगे- पाटील यांचे अभिनंदन केले.