तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
आरंभ मराठी / नांदेड
एका तरुणाने लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दरम्यान चक्क ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडण्याची धक्कादायक शुक्रवारी घटना घडली.त्यानंतर संबधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हा प्रकार बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे अंदाजे पाच वाजेच्या सुमारास घडला.भय्यासाहेब आनंदा एडके ( २५ वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण पदवीधर असून, रोजगार मिळत नसल्याने त्याने रागाच्या भरात मतदानासाठी गेल्यानंतर बुथ क्रमांक १०३ मध्ये जाऊन ‘मी आता किती दिवस बेकार राहू’ असे म्हणत स्वतःच्या खिशातून दांडा नसलेली कुऱ्हाड काढून ईव्हीएम मशीन फोडले. हा प्रकार पाहून बुथमध्ये एकच गोंधळ उडाला.त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. हा तरूण मुळचा नायगाव तालुक्यातील कोठाळा गावचा रहिवासी आहे.घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तो अगदी लहानपणापासूनच आपले आजोळ रामतिर्थ येथे राहत होता. त्याचे नावही येथील मतदार यादीत आहे.
हा तरूण पदवीधर असून गावात मिळल ते काम करीत असत.हे काम करीत असतांना त्याच्या मनात आपण बेकार असल्याची खदखद होती अशातच तो अंदाजे सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास दांडा नसलेली लोखंडी कुर्हाड खिशात ठेवून मतदान करण्यासाठी गेला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान मशिनजवळ जाऊन मशीन फोडले.याप्रकरणी त्याच्याविरुद्ध रामतिर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली.