आरंभ मराठी / कळंब
शहरातील बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद करण्यात आली असून, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर देखील या बंदचा परिणाम झाला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद पाळण्यात आला आहे.कळंब तालुक्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बंद पाळण्यात आला असून, रविवारी याबद्दलची माहिती देण्यात आली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आपल्या बंदमध्ये सहभाग नोंदवावा व आपल्या तालुक्याचे परंपरेनुसार शांततामय मार्गाने हा बंद सर्वांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.