प्रतिनिधी / कळंब
मोहेकर महाविद्यायातील 11 वी ते पदवी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना MKCL च्या वतीने सायबर सेक्युरिटी या विषयावर गायत्री कॉम्प्युटर्सचे शाम जाधवर यांनी मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन प्रेझेंटेशनच्या मदतीने प्रोजेक्टरद्वारे देण्यात आले.
महाविद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थांना या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.इंटनेटच्या या आधुनिक युगात जशी प्रगती होत आहे तसेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. भारतामध्ये दररोज हजारो सायबर क्राईम घडत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक सध्या सायबर क्राईमला बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. बँकेमधून बोलत आहोत, आपले अकाउंट बंद पडले आहे किंवा आपले कार्ड ब्लॉक केले आहे, अशा प्रकारचे कॉल येतात आणि आपली पॅन कार्ड, आधार कार्ड, OTP यांची माहिती विचारली जाते. याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होते. या फसवणुकीतून कसे वाचायचे याची माहिती या कार्यक्रमामध्ये दिली गेली. अल्पवयीन मुले मोबाईलच्या आहारी जाऊन त्याचे होणारे विपरीत परिणाम, सध्या सोशल मेडिया वापण्याचे वाढलेले प्रमाण व त्यातून होणारे नुकसान किंवा फसवणूक, सोशल मीडिया अकाउंट हॅक होऊ शकते, त्यातून कसे वाचायचे, झटपट लोन देणारे फसवे मोबाईल ऍप्प, ऑनलाईन लॉटरी लागलेली आहे असे खोटे सांगून होणारी फसवणूक, ATM कार्डद्वारे कशा प्रकारे फसवणूक केली जाऊ शकते, याबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन गायत्री कॉम्प्युटर्सचे संचालक शाम जाधवर यांनी केले.
MKCL आणि सारथीच्या संयुक्त विद्यमाने मराठा समाजातील विद्यार्थ्याना मोफत असणाऱ्या कोर्सबद्दलची माहितीही कार्यक्रमामध्ये देण्यात आली.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुनील पवार, व डॉ. हेमंत भगवान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सू्त्रसंचालन व उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी प्रा.एन.एम. अंकुशराव, डॉ.समाधान चंदनशिवे, डॉ. हेमंत चांदोरे, प्रा.राम दळवी, प्रा. जयवंत ढोले, प्रा. श्रीमती वायभसे, प्रा. श्रीमती घाटपारडे, प्रा श्रीमती पाटील, प्रा. श्रीमती खोसे आदी उपस्थित होते.प्रा. हनुमंत जाधव, प्रा.अरविंद शिंदे, प्रा. डॉ.संदीप सूर्यवंशी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.