प्रतिनिधी / धाराशिव
तालुक्यातील चिखली येथील गांधी विद्यालयात धाराशिव तालुका अंतर्गत घेण्यात आलेल्या समुद्रवाणी बीट स्तरीय शालेय स्पर्धेत दारफळ प्राथमिक शाळेचा मुलांचा संघ 14 वर्ष वयोगटातील प्रथम आला आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेमध्ये दारफळ शाळेच्या संघाने घुगी संघाचा पराभव केला आहे. या स्पर्धेत आदित्य सुरवसे यांच्या अष्टपैलू खेळामुळे संघ अंतिम स्पर्धेत विजयी होऊ शकला. विस्तार अधिकारी नवनाथ आदटराव, केंद्रप्रमुख राजाभाऊ गिरी, शाळेचे मुख्याध्यापक व संघाचे जिल्हाध्यक्ष बिभीषण पाटील, बाबा मते, बळवंत घोगरे, मोहन जगदाळे,अभय हाजगुडे आदींनी विजय संघाचे अभिनंदन केले व तालुका स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.