प्रतिनिधी / धाराशिव
गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक तास बंदोबस्तावर असलेल्या पोलीस बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी युवा सेनेच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. हा उपक्रम युवा सेनेचे नेते दिनेश बंडगर यांच्या वतीने घेण्यात आला. या उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही आयोजकांचे कौतुक केले.
धाराशिव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना आमदार कैलास पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बांगर, युवासेना विभाग सचिव तथा जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, नगरसेवक राणा बनसोडे यांच्या हस्ते शहरातील विविध चौकात अल्पोपहारासाठी फूड पॅकेट वाटप करण्यात आले. या फूड पॅकेटमध्ये एक समोसा,एक केळी आणि एक पाणी बॉटल असे त्याचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना नेते दिनेश बंडगर व शिवसेना युवासेना संपर्क कार्यालय देशपांडे स्टँड यांच्यावतीने करण्यात आले.यासाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. अल्पोपहार वाटप करण्यासाठी प्रशांत कडेकर, रवी वढणे, अजय विंचुरे ,सुधीर अलकुंटे,प्रदीप वाघमोडे, विक्रांत देशमुख ,बालाजी कांबळे, विजय आव्हाड, विशाल बंडगर ,अक्षय जाधव, मुन्ना मराठे, आकाश गाढवे, गणेश काळे ,यशवंत कांबळे, बंटी शिंगाडे, चेतन मस्के ,कुलदीप जाधव, रितेश पवार, विकास उबाळे, केदार हिबारे,आकाश बघेल, अभिजीत विभुते, नितीन मगर ,आदित्य पाटोळे, अनुराग बघेल ,अंकित बघेल ,पवन पारधी,दीपक गुंडाप्पा ढगे,शौकत चौधरी,इब्राहिम खान, सुदेश बघेल, रेहान सय्यद फैसल शेख ,रेहान शेख ,प्रदीप बघेल,वाहन चालक सलीम शेख यांनी पुढाकार घेतला.