प्रतिनिधी / धाराशिव
असोसिएशन ऑफ आर्किटेक्चर & सिव्हिल इंजिनिअरची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून,असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्यामकांत नाईकनवरे तर सरचिटणीसपदी दशरथ धुमाळ यांची निवड करण्यात आली. शहरातील विकासाला व नगर परिषदेच्या तांत्रिकदृष्ट्या पुरक सहकार्य करणाऱ्या असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्चर & सिव्हिल इंजिनिअरची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी मावळते अध्यक्ष रणजीत रणदिवे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात रणदिवे यांनी सर्वानुमते नूतन कार्यकारणी जाहीर केली. यावेळी इंजि.पी.के मुंडे, नाडे, इंगळे, के.एम. शेख,नुर शेख, जुल्फिकार काझी यांनी असोसिएशनच्या चालू असलेल्या घोडदौडीबद्दल अभिमान आणि समाधान व्यक्त केले. तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांनी असोसिएशनची जबाबदारी हे पूर्ण निष्ठेने व प्रत्येक अभियंत्याच्या प्रश्नाकडे वैयक्तिक पातळीवर व संघटनेची जबाबदारी समजून कार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी व्यक्त केले. नवनियुक्त अध्यक्ष नाईकनवरे यांनी दिलेली ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडू असे अश्वासित केले.कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते अध्यक्ष शामकांतजी नाईकनवरे, उपाध्यक्ष रवी जाधव,सरचिटणीस आकिर्टेक्ट दशरथ धुमाळ,सहसचिव नितिन विधाते,कोषाध्यक्ष बिलाल अन्सारी यांची निवड करण्यात आली. बैठकीचे आभार गाझी सय्यद यांनी मानले.
यावेळी असोसिएशनचे अभियंते उपस्थित होते.