आरंभ मराठी/ धाराशिव
सोलापूर येथील भाविक रामकृष्ण शिवयोगी देवनगांव संपूर्ण कुटुंबासह शुक्रवारी सकाळी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनाच्या वेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ५५ ग्रॅम म्हणजेच साडेपाच तोळे सोने श्रद्धेने श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी अर्पण केले.यानंतर मंदिर संस्थानकडून कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
अर्पण केलेल्या मध्ये एक सोन्याचा नेकलेस हार (४६.७२० ग्रॅम) व एक सोन्याचा साधा हार (९.०८० ग्रॅम) असे एकूण ५५.८० ग्रॅम सोने देवनगांव कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी अर्पण केले. देवनगण कुटुंब हे निस्सीम श्री तुळजाभवानी देवीचे भक्त असून ते नियमितपणे देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
या श्रद्धाभक्तीची दखल घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने देवनगांव कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, विश्वास कदम, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, धार्मिक विभागाचे लिपिक राकेश पवार तसेच मंदिर संस्थानचे इतर कर्मचारी उपस्थित होते.