प्रतिनिधी / शिराढोण
प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान सध्या संपूर्ण देशात राबविले जात आहे. यात सहभाग म्हणून येथील आदर्श युवा गणेश मंडळाच्या वतीने 30 निक्षयमित्र तयार करुन 30 रुग्णांच्या सकस अहाराची जवाबादरी घेतली आहे. क्षय रुग्णांना नियमीत औषधोपचार व सकस अहाराची गरज असते. शासनाने निर्धारीत केलेल्या निकषानुसार शिराढोण येथे मंडळाच्या वतीने 30 निक्षयमित्रांनी फुड बास्केट तयार करुन प्राथमिक आरोग्य केंद्रास सुपूर्त केले. या उपक्रमाची दखल जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.रफिक अन्सारी यांनी घेत या मंडळास भेट देवून क्षयरोग या आजाराबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.जे.एन.सय्यद, वैद्यकीय अधिकारी डाॅ.नवनाथ घुले, क्षयरोग अधपरिचारक सचिन परदेशी,सुरेश यादव, आरोग्य सहाय्यक तूकाराम लोहार,प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश कावळे,मंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील, आकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर पाटील, ॲड.नितीन पाटील, डाॅ.आमोल यादव, अवधूत पाटील आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ.अन्सारी यांनी प्रसारमाध्यम, सामाजीक संस्था, लोकप्रतिनीधी, सामाजी कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त पुढकार घेवून निक्षयमित्र होवून सकस अहार देवून क्षयरोगाप्रति लढण्यासाठी शारीरीक तसेच मानसीक बळ प्रदान करावे असे अवाहन केले. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने निक्षयमित्र तयार करून क्षयरोग मुक्तीसाठी पुढाकार घेतलेल्या आदर्श युवा गणेश मंडळाचे या उपक्रमाबाबत कौतूक करुन त्यांचे आभार मानण्यात आले.
आदर्श युवा गणेश मंडळा तर्फे गावातील समाज कार्यात सक्रीय असणारे 30 निक्षयमित्र तयार करुन त्यांच्या माध्यमातून क्षयरोग रुग्णांना सकस अहार देण्यत येणार आहे. यामध्ये सुनील जोशी, दादासाहेब काळे, अमोल माळी, नारायण खडबडे, योगेश यादव, फेरोज पठाण, गणेश निकम, बाळासाहेब बाळापुरे, वैभव कोंडेकर, सचिन परदेशी, राजेश्वर पाटील, डाॅ.अमोल यादव,अमोल मुंदडा, शैलेंद्र यादव, अॅड.नितीन यादव, महादेव भस्कर भंडारे, प्रणय कोंडेकर, दादासाहेब वाघमारे, अनिल समुद्रे, गणेश जाधव, महेश धाकातोडे, गणपत वाघमारे, वरुण पाटील, शरद पवार,वसंत काळे, अमोल यादव, शरद डावकरे यांचा सहभाग आहे. या