प्रतिनिधी / धाराशिव
अल्पावधीतच बांधकाम व्यवसायात यशस्वी भरारी घेत युवकांमध्ये आदर्श स्थान निर्माण केलेल्या युवा उद्योजक तथा सिव्हिल इंजिनीयर राहुल गवळी यांना पुण्यातीलग् लोबल स्कॉलर फाऊंडेशनच्या वतीने बेस्ट बिझनेसमॅन पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यातील बाणेर येथील यशदा ऑडोटोरियम, यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट येथे हा बेस्ट बिझनेसमॅन इन कन्स्ट्रक्शन फिल्डचा राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार मान्यवर पद्मश्री सुधाकर ओळवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या पुरस्काराबद्दल गवळी यांचे अभिनंदन केले जात आहे.
राहुल गवळी हे बांधकाम व्यवसायिक असून, बालाजी ग्रुपच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात विविध व्यवसायात तसेच सामाजिक कार्यात नावलौकिक केलेला आहे तसेच व्यवसायातील नफा-तोटा विचारात न घेता धाराशिव शहरातील विविध महापुरूषांच्या 11 चौकांचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले आहे. कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि नाविन्यता पाहून नागरिकांतूनही समाधान व्यक्त केले जाते. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन आज पुणे येथे राहुल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
व्यवसायाचा समर्थ वारसा
राहुल यांचे वडील लक्ष्मण गवळी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांच्या या व्यवसायाला राहुल यांनी आधुनिकतेची जोड देऊन हा वारसा समर्थपणे पुढे सुरू ठेवला.किंबहुना त्यात वृद्धी केली. व्यवसायासोबत त्यांनी सामाजिक कार्यावर भर दिला.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना आजवर सन्मानित केले आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.