आरंभ मराठी / धाराशिव
पत्नीसोबत होत असलेल्या सततच्या वादामुळे आणि पत्नीवर गंभीर आरोप करत एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील आळणी येथे घडली आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीने धाराशिव शहरातील एका दुकानदाराने देखील मानसिक त्रास दिल्याचे आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हिडिओत म्हंटले आहे. त्या दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी आता आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी केली आहे.
या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तानाजी नानासाहेब भराडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तानाजी भराडे यांनी एक व्हिडीओ काढून तो समाजमाध्यमावर टाकला आहे.
या व्हिडीओ मध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. 29 सेकंदाच्या या व्हिडीओ मध्ये पत्नी आणि एक व्यक्ती काही दिवसांपासून मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले आहे.
व्हिडीओच्या शेवटी तानाजी भराडे हे रडत असल्याचेही दिसते. या घटनेमुळे धाराशिव तालुक्यात खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.