आरंभ मराठी / तेर
सुभाष कुलकर्णी : संत परीक्षक संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पायी पालखी सोहळ्याचे पंढरपूर येथे कार्तिक शुद्ध एकादशी च्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धाराशिव तालुक्यातील तेर येथील समाधी मंदिरातून गुरूवारी भाऊबीजेच्या दिवशी प्रस्थान केले.
मिञचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील मंदिर संस्थानचे निरीक्षक अतुल नळणीकर. यांच्या हस्ते मंदिराचे पुजारी रघुनंदन महाराज पुजारी, उपसरपंच श्रीमंत फंड माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी भास्कर माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी चे शेकडो वारकऱ्यांच्यासह प्रस्थान झाले
ज्ञानोबा तुकाराम या हरीनामाचा गजर करीत शेकडो वारकरी भु वैकुंठभुमी असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी निघाले.
पालखी सोहळा हिंगळजवाडी.( २३) वरूडा(२४) २५ऑक्टोबर रोजी धाराशिव शहरात मुक्कामी थांबून रविवार दि.२६ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून या दिवशी भातंब्रा येथे मुक्कामी
रहाणार आहे
,वैराग मुक्कामानंतर दुपारी पालखी ढोराळा याठिकाणी संत गोरोबाकाका व संत बाळाजी बाबा या दोन संतांच्या भेटीनंतर पालखी यावली या ठिकाणी मुक्कामी पोहोचेल.,खैराव ,अनगर रोपळा असा पायी प्रवास करत १नोव्हेंबर दशमी दिवशी पहाटे चंद्रभागेच्या तीरावर पोहोचेल.त्त्याठिकाणी चंद्रभागा नदीत काकांच्या पादुका स्नान होईल. पालखीचा ५नोव्हेबर पर्यंत पंढरपूर येथील संत गोरोबाकाका मठात जरहाणार आहे त्याठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात .
यावेळी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर, बंडू महाराज पुजारी,रवीराज चौगुले ,अजीत कदम,विठ्ठल लामतुरे,भागवत भक्ते, अविनाश आगाशे, नामदेव कांबळे,भुजंग खांडेकर,भारत नाईकवाडी, गोरोबा पाडूळे नवनाथ इंगळे ,नाना गायके,, यांच्या सह हजारो भाविकांनी काकांच्या पालखीचे दर्शन घेतले .
यावेळी बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर, विलास माळी यांच्या सह ढोकी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
चौकट
पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी,भाविक यांना अहिल्यादेवी होळकर चौक,शिव नरसिंह ग्रुप, सोनाई प्लाझा, मारूती देवकर यांच्या वतीने मसाला दुध त्याचप्रमाणे ठिक ठिकाणी केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले










