आरंभ मराठी / धाराशिव
धारशिवच्या पोलीस अधीक्षक पदी २०१८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नऊ महिन्यांपूर्वी अतुल कुलकर्णी यांच्या जागी संजय जाधव यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतला होता. परंतु, त्यांना एक वर्षाचा देखील कार्यकाल मिळाला नाही.
रितू खोकर ह्या भारतीय पोलीस सेवेतील २०१८ च्या तुकडीमधील पोलीस अधिकारी आहेत. रितू खोकर ह्या मूळच्या हरियाणा राज्यातील पानिपत येथील असून त्यांचे वडील गावचे सरपंच होते. त्यांनी कुरुक्षेत्र विश्वमहाविद्यालय मधून एम. एस्सी. गणित विषयात सुवर्ण पदक पटकाविले होते तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या या यशाबद्दल त्यांना सन्मानित केले होते.
रितू खोकर या सध्या सांगली जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक आहेत. त्यापूर्वी त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलेले आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर आणि अपर पोलीस अधीक्षक म्हणून शफाकत आमना अशा दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून महिलाच विराजमान झाल्या आहेत. नूतन पोलीस अधीक्षकांसमोर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान असणार आहे.