परंडा येथील घटनेने हळहळ,
आरंभ मराठी / परंडा
महाविद्यालयातील निरोप समारंभाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा झटका येऊन एका २० वर्षीय मुलीचा अंत झाल्याची घटना घडली असून, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना परंडा शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालयात शुक्रवारी घडली.वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव असून,ती विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले होते.
शुक्रवारी महाविद्यालयात आयोजित निरोप समारंभातच भाषणा दरम्यान तिला ऱ्हदयविकाराचा झटका आला.
मूळची माढा तालुक्यातील नाडी येथील वर्षा खरात (२० वर्ष) हिने १० वीनंतर परंडा येथील रा.गे. शिंदे महाविद्यालयात ११ वी मध्ये प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पदवी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या निरोप समारंभात वर्षा खरात आपल्या मित्र परिवाराशी संवाद साधत असताना तिला ऱ्हदयविकाराचा झटका आला. यावेळी ती भाषण करताना जागीच कोसळली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घबराट निर्माण झाली.मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी तात्काळ तिला दवाखान्यात दाखल केले. परंतू तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वर्षाने महाविद्यालयास निरोप देऊन या जगाचा निरोप घेतला,त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लहानपणापासूनच हृदयाचा त्रास
वर्षा हिला लहानपणापासुनच ऱ्हदयाचा त्रास होता. त्यामुळे ती तिसरी- चौथीमध्ये शिकत असताना म्हणजे १५ वर्षापुर्वी तिचे व्हॉल्व बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिचे ह्दय कधीही बंद पडु शकते, असे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते, अशी माहिती तिचे वडील भारत खरात यांनी दिली दिली.