कळंब / प्रतिनिधी
कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल, कळंब व रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय गणपती कार्यशाळेचे आयोजन शनिवार (दी.16) रोजी कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल, कळंब येथे करण्यात आले होते.
पूर्णतः मोफत असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये जवळपास 400 विद्यार्थी सहभागी झाले होते.माती आणि शाडू पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचा आनंद कार्यशाळेत सहभागी झालेल्या बालकांनी घेतला.कला शिक्षक शरद अडसूळ आणि जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई येथे प्रशिक्षण घेत असलेल्या कु.गायत्री जाधवर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती कसा बनवायचा याचे प्रशिक्षण दिले.
आपण स्वतः तयार केलेल्या गणपतीचीच प्रतिष्ठापना आपल्या घरी करणार असा संकल्प घेऊन, सर्व बालकांनी स्वतः तयार केलेली पर्यावरण पूरक गणेशमूर्ती आपल्या सोबत घेऊन गेले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सचिन पवार, अध्यक्ष रवी नारकर, सचिव डॉ. साजेद चाऊस, कॅनव्हास स्कूल चे संचालक रवि नरहिरे तसेच रोटरी चे सर्व सदस्य आणि कॅनव्हास स्कूल च्या सर्व प्रशिक्षक वर्गाने सहकार्य केले.