• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, March 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Crop’s Insurance सकारात्मक निर्णयाची अपेक्षा; 2023 च्या पीक विम्यासाठी 15 ऑगस्टनंतर दिल्लीत बैठक 

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 12, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
302
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची शेतकऱ्यांना माहिती, जिल्ह्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी शासनाचा प्रयत्न


आरंभ मराठी / धाराशिव

खरीप 2023 मध्ये पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना 25 % अग्रीम भरपाई मिळाली असून, इतर 25 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानीप्रमाणे विमा मिळाला आहे. मात्र 32 मंडळातील शेतकरी अद्याप वंचित असून 15 ऑगस्टनंतर दिल्लीत त्यासंबंधी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आणि देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोलणे झाले असून, त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, जिल्हयातील विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रूपयात पीकविमा देण्याची योजना सरकारने आणली. यामुळे एकट्या कोंड गावातील शेतकऱ्यांचे या योजनेमुळे जवळपास १५ लाख रूपये राज्य शासनाने वाचविले आहेत. शाश्वत सिंचनासाठी साडे अकरा हजार कोटी रूपयांचा निधी कृष्णा मराठवाडा प्रकल्पास मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्याची ओळख बदलणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा काही दिवसांत पूर्णत्वास जाणार आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळेच असे प्रकल्प मार्गी लागत आहेत. राज्य शासनाकडून हे प्रकल्प प्राधान्याने पूर्णत्वास नेले जात आहे. यामुळे जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होऊ शकेल, असे मतही आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी ॲड. रामेश्वर शेटे, माजी सभापती दत्ता देवळकर, बाळासाहेब खांडेकर, ग्रा.प. सदस्य राहुल जाधव, संजय पाटील, अनुरथ भोसले, अशोक भूमकर, बाळु गिरी, दत्ता गायकवाड, प्रवीण शेटे, विश्वास पाटिल, उमाकांत भुमकर, विष्णु लोंढे, शंकर सर्जे, महादेव जाधव, सुमित पाटील, किशोर सर्जे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधकांनाही विचारा, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला का ?

गावातील आपल्या विरोधकांना विचारा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला की नाही? अनेकांनी तो भरला असेलच. याचा अर्थ राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेवर आपल्या विरोधकांचाही विश्वास आहे. मागील अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये ही योजना यशस्वीपणे सुरू आहे. आपल्या कडेही ती यशस्वी होणार आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद सर्व काही स्पष्ट करणारा असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis #ajitdadapawar #NarendraModi #ranajagjitsinghpatil #cropsinsurance #issue #in #india
SendShareTweet
Previous Post

शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या; सोयाबीन, कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी पाच हजारांचे अनुदान

Next Post

Dharashiv News धाराशिव नगर पालिकेच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी आता पोलिस विभागामार्फत; राज्य सरकारचे पोलिस महासंचालकांना पत्र

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

Dharashiv News धाराशिव नगर पालिकेच्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी आता पोलिस विभागामार्फत; राज्य सरकारचे पोलिस महासंचालकांना पत्र

धैर्यशाली, शौर्यशाली, लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group