• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जम्मू-काश्मीरमधील विघ्ने दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचे थेट श्रीनगरच्या गणरायाला साकडे

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 18, 2023
in देश
0
0
SHARES
59
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

श्रीनगर

काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली. जम्मू-काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर होऊ देत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.

श्रीनगरमधील लाल चौकात मराठी सोनार समाज राहतो. पूर्वी घरीच गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जात असे. पण 24 वर्षांपूर्वी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये स्थानिक मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग असतो. दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रासह देश- विदेशातील मराठी समाज गणेशोत्सव उत्साहात साजरा करतो. श्रीनगरमधील मराठी समाजामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या मंडळास भेट देऊन त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद वाटला.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार म्हणाले की, श्रीनगर येथील लाल चौकात साजरा होणारा गणेशोत्सव हा महाराष्ट्र आणि काश्मीरमधील सौहार्दाचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे नियोजन स्थानिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

महाराष्ट्र-काश्मीरच्या मैत्रीचे नवे पर्व

महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी सांगितले.

पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या ‘हम सब एक है’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्थेचे संजय नहार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा तसेच कोविड काळात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील 73 नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना ‘वन इंडिया रिंग’ने सन्मानित करण्यात आले.

काश्मिरशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दृढ ॠणानुबंध होते, याचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे. सरहद या संस्थेच्या माध्यमातून आपले जुने नाते आणखी मजबूत करण्याचा हा उपक्रम आहे. ‘सरहद’ संस्थेने मानवतेच्या क्षेत्रात आगळे काम केले आहे. संस्था आपत्कालीन आणि अगदी कोविडच्या संकटात धावून आली आहे. संस्थेच्या माध्यमातून पुण्यात काश्मिरी तरुणांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या शिक्षणातील आरक्षणासाठी वंदनीय बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. ज्या- ज्यावेळी काश्मिरला आलो त्यावेळी येथील बांधवानी आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे सांगून, मुख्यमंत्र्यांनी आपण सदैव काश्मिरी बांधवांच्या प्रगतीसाठी  सज्ज राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.

काश्मिरला निसर्गाचे अपूर्व वरदान लाभले आहे. महाराष्ट्र आणि काश्मिर दोन्ही राज्यांत पर्यटनाच्या अमर्याद संधी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.पनवेल येथे काश्मिरी नागरिकांसाठी दिलेल्या जमिनीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. तसेच काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो 11 कलमी’ कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच जी-20 च्या निमित्ताने भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले व यात काश्मिरसह अनेक राज्यांना आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे ते म्हणाले.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar
SendShareTweet
Previous Post

धाराशिवमध्ये मराठा भवन उभारा; पालकमंत्री सकारात्मक, जिल्हा प्रशासनाकडून मागवला शहराचा विकास आराखडा

Next Post

अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतकडून वैकुंठरथ खरेदीची नितांत गरज

Related Posts

चलो नागपूर; 28 डिसेंबरला काँग्रेस जाहीर करणार लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका

December 18, 2023

lieutenant ruturaj badale अभिमानाचा क्षण.. धाराशिवचा सुपुत्र ऋतुराज झाला लेफ्टनंट: प्रशिक्षण पूर्ण, मथुरेत पहिली पोस्टिंग

December 10, 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी उद्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमसोबत करार; महाराष्ट्रात राजकारण तापले

October 2, 2023

चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

July 14, 2023

केंद्राकडून महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक 1420 कोटींचा निधी; ओला दुष्काळ, नुकसान भरपाईसाठी नियोजन

July 13, 2023

केरळमधील मुलाचा ‘ब्रेन इटिंग अमीबा’मुळे मृत्यू; नाकावाटे मेंदूत शिरतो हा जीव

July 8, 2023
Next Post

अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतकडून वैकुंठरथ खरेदीची नितांत गरज

जिल्ह्यातील उर्वरित १७ मंडळांनाही खरीप पीकविम्याचा अग्रीम; यापूर्वीच ४० मंडळांना भरपाई देण्याचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

May 19, 2025

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group