प्रतिनिधी / मुंबई
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एकीकडे महाराष्ट्रात आंदोलन जोर धरत असतानाच आता छावा संघटनेनेही या आंदोलनात उडी घेतली आहे.14 तारखेपर्यंत आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यास दिल्लीत धडक मारू असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा संघटनेने दिला आहे.त्यामुळे राज्यातील आंदोलनाची झळ आता दिल्लीला देखील बसण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय छावा मराठा संघटनेची राज्यस्तरीय महत्वपूर्ण बैठक आज गुरूवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे,कार्याध्यक्ष भीमराव मराठे, मराठवाडा अध्यक्ष देवकरण वाघ, आयटी सेल प्रमुख विश्वजित जाधव,छावा संघटना सल्लागार सत्यशील कदम यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी बैठकीत नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण का मिळत नाही, १४ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र सरकार आरक्षण देवू शकत नसेल तर येणाऱ्या काही दिवसांत अण्णासाहेबांचे छावे दिल्लीत दाखल होततील आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत,असा इशारा दिला. ते म्हणाले, मराठा आरक्षणसाठी घटना दुरुस्त करून 50% ची कॅप तोडून केंद्र सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे. अनेक वर्षांपासून छावा संघटना मराठा आरक्षणसाठी लढाई करत आहे आणि यापुढेही मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही. छावा पदाधिकाऱ्यांनी निष्क्रिय न राहता मराठा आरक्षण, शेतकरी लढा, अन्यायाला वाचा फोडावी आसे आदेशच त्यांनी दिले. मुंबई तो झांकी है, दिल्ली अभी बाकी है, एकच मिशन मराठा आरक्षण, स्व.अण्णासाहेब जावळे पाटलांचा जयजयकार, नानासाहेब जावळे आप आगे बढो,अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. या बैठकीला धाराशिवचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव, धाराशिव तालुकाध्यक्ष रोहित पाटील, वाहतूक आघाडी रामहरी भोसले, संघटक अमोल गोरे,सचिव ज्योतिराव काळे,अमोल मोरे, छावा धाराशिव संघटनेचे पदाधिकारी,धाराशिव येथील शेकडो छावे उपस्थित होते. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची भाषणे झाली.