बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भाषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातून आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली त्यानंतर पलटी झाली त्यानंतर लगेच बसने पेट घेतल्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र भीषण अपघातातून ड्रायव्हर आणि कंडक्टर बचावले आहेत. ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेखला किरकोळ दुखापत झाली आहे. तर सेकंड ड्रायव्हर अरविंद मारुती जाधव अपघातावेळी झोपला होता. दुसऱ्या ड्रायव्हरलाही किरकोळ दुखापत झालेली आहे.
या अपघातासंदर्भात बसचा ड्रायव्हर दानिश शेख याने असं सांगितले की, बसचा टायर फुटल्यामुळे अपघात झाला आहे. तर अपघातग्रस्त बसचे सर्व टायर जळून खाक झाले आहेत. टायर फुटल्याचा कोणताही पुरावा किंवा निशाणी घटनास्थळी मिळालेली नाही. त्यामुळे बसचा टायर फुटला होता की दुसरं काही कारण आहे? असा प्रश्न आता समोर आला आहे. दरम्यान, बसचालक दानिश शेख इस्माईल शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बसमध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते. बसला आग लागताच यातील 8 प्रवासी काचा फोडून बाहेर पडले. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुर्दैवी 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.(Latest Marathi News)
डीएनए तपासणीसाठी सर्व मृतदेह बुलढाणा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त प्रवाशांमधील 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मेहकर रुग्णालयात 1 आणि सिंदखेडराजा रुग्णालयात 2 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज देण्यात आलेले सर्व प्रवासी संभाजीनगरचे असल्याची माहीती आहे.(Latest Marathi News)