पतिनिधी / भूम
येथील प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये रेड डे चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने रक्ताचा होत असलेला तुटवडा लक्षात व सामाजिक बांधिलकी म्हणुन रक्तदान व रक्त गट तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन अश्विनकुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तानाजी सुपेकर शाळेच्या प्राचार्या कल्याणी असलकर, ब्लड बँकेच्या सुप्रिया गडकर आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थांनी लाल रंगाचे कपडे परिधान करून वेगवेगळे सामाजिक संदेशाचे फलक व प्रतिकृती बनवल्या होत्या. सध्या टोमॅटोचे वाढलेले दर, रक्तदानचे महत्व पटवून देणारे फलक लक्ष वेधून घेत होते. लाल रंगाच्या जास्तीत जास्त विविध वस्तू ही विद्यार्थ्यांनी आणल्या होत्या. यावेळी पालकांची उपस्थितीही लक्ष्णीय होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सरस्वती कुलकर्णी, मेघा सुपेकर, जयश्री बन, आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे, गणेश सुपेकर, अतुल पुणेकर, स्वप्नील सुपेकर, दिगंबर पुणेकर,कृष्णा गुळमे, निखिल गुळमे आदींनी परिश्रम केले.