प्रतिनिधी / धाराशिव
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा वेध घेण्यासाठी आपण वर्तमानपत्र वाचतो.केवळ आजूबाजूला घडलेली घटना देणं एवढंच वर्तमानपत्रांचं काम आहे का..? सभोवतालच्या घटना घडामोडी पोहोचवतानाच नवा विचार, नवी दिशा देणं हेही पत्रकारितेचं कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून आणि ‘आरंभ नव्या पर्वाचा, आरंभ नव्या विचाराचा’ हा वसा घेऊन २६ जानेवारीपासून ‘ आरंभ मराठी’ हे नवीन दैनिक धाराशिव येथून सुरू करत आहोत. शुक्रवार,२६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते आरंभ मराठी दैनिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन होणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ. प. प्रकाश बोधले महाराज यांच्यासह खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले तसेच जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच या प्रकाशन सोहळ्याला धाराशिव जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जि. प. चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास (आप्पा) शिंदे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सिद्धिविनायक मल्टिस्टेटचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (आण्णा) पाटील, बालरोगतज्ज्ञ डॉ अभय शहापूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) संजय निंबाळकर, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सूरज साळुंके,शिवसेना, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, माजी उपनगराध्यक्ष न. प. धाराशिव अमित शिंदे,रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ.अनार साळुंके, माजी नगरसेवक खलील सय्यद सर, ज्येष्ठ नेते धनंजय शिंगाडे, यशदा परिवाराचे अध्यक्ष सुधीर सस्ते, उद्योजक विकास देशमुख, डॉ तानाजी लाकाळ या मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती आहे. या दैनिकाला शुभेच्छारुपी पाठबळ देण्यासाठी आणि आरंभ मराठी परिवाराचा भाग होण्यासाठी धाराशिव जिल्हा आणि परिसरातील जाहिरातदार, वितरक, वाचकांनी, हितचिंतकानी प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दैनिक आरंभ मराठीचे मुख्य संपादक चंद्रसेन देशमुख यांच्यासह टीमने केले आहे.