प्रतिनिधी / पारगाव
वाशी तालुक्यातील हातोला येथे शेतकरी पिक विमा कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सुनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांना प्रधान मंत्री पिक विमा, महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना व सोयाबीन पिकावर येणाऱ्या यलो mozak या रोगावर प्रतिबंधक उपाय आणि गोगलगाय प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबद्दल माहिती दिली.
सुक्ष्म अन्न द्रव्य तशेच कृषि पर्यवेक्षक जाधव यांनी महाडीबीटीवर शासनाच्या अनेक योजना सांगून शासनाची सबसिडी किती असते व शेतकऱ्यांनी तृणवर्गीय ज्वारी, बाजरी आदी व डाळवर्गीय मूग उडीद ,चवळी, हुलगा, मटकी, तुर आदींचा पेरा वाढवावा, असे आवाहन केले. एच.डी.एफ.सी. तालुका प्रतिनिधी रामेश्वर सुरवसे यांनी आपल्या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एच.डी.एफ.सी. इर्गो या विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री खरीप पिकविमा योजना 2023 -2024 मध्ये राबविली जात आहे. पिक विमा भरताना शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँकपासबुक, 7/12 व आठ अ आणि स्वयंघोषणापत्र घेवून आपल्या जवळच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्र व अधिकृत सी.एस.सी.आदी केंद्रामधून आपल्या अधिसूचित पिकांचा पिकविमा भरून घ्यावा, असे सांगितले. शेतकऱ्यांना एका खातेदाराने 1 रुपये प्रमाणे जेवढे गट त्याप्रमाणे 1 रुपया पिक विमा उतरवून घ्यावा. बँक किंवा सी.एस.सी. सेंटरवर प्रति गट 1 रुपयाप्रमाणे भरावे व विम्याची शेवटची दिनांक 31 जुले असून, विमा भरल्यानंतर आपल्या पिकांची जोखीम काय असते, पेरणीपासून ते काढणीपर्यंत व विमा कसा मिळतो, याचे मार्गदर्शन रामेश्वर सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पवार मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून कृषी कार्यालयाचे मंडळ कृषी अधिकारी सुनिल चव्हाण व कृषि पर्यवेक्षक जाधव, शरद पवार,खोमणे ,जगताप,खवले आदींसह शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक रामेश्वर सुरवसे यांनी केले तर आभार सुजित मोरे यांनी मानले.