• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, July 30, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १७ जण गंभीर जखमी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 30, 2026
in Accident
0
शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १७ जण गंभीर जखमी
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी | धाराशिव

छत्रपती संभाजीनगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळील आळणी चौकात बुधवारी (दि. २९) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात उमरगा तालुक्यातील बोरी येथील दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव हायवा कंटेनरने पिकअप वाहनाला दिलेल्या जोरदार धडकेत पिकअपचे अक्षरशः दोन तुकडे झाले. या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली.
या अपघातात छबू दुधभाते (वय ४०, रा. बोरी, ता. उमरगा) आणि बब्रुवान सूर्यवंशी (वय ६५, रा. बोरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य १७ जण जखमी असून त्यांच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील बोरी येथील भाविक पुणे ते शिर्डी या पायी वारी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन सर्व भाविक पिकअप (एमएच-२५-पी-४००३) मधून आपल्या मूळ गावी बोरीकडे परतत होते. दरम्यान, पिकअप आळणी चौकातून जात असताना ढोकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने (एमएच-१७-सीव्ही-२६६५) पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. वाहनातील सर्व प्रवासी जखमी झाले असून अनेकांना गंभीर दुखापती झाल्या.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि त्वरित उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकांद्वारे सर्व जखमींना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने उपचारासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. या भीषण अपघातामुळे बोरी गावावर शोककळा पसरली असून शिर्डीहून आनंदाने परतणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

SendShareTweet
Previous Post

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

Related Posts

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

July 13, 2026

मेडसिंगा पाटीजवळ भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

May 25, 2026

कोणत्या जन्माची चूक भोगत आहेत धाराशिवकर ..?

May 6, 2026

चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण – तरुणीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

February 22, 2026

कळंब–लातूर रोडवर भीषण अपघात; चारचाकीने सात ऊसतोड कामगारांना चिरडले

December 22, 2025

धाराशिव-उजनी रस्त्यावर ट्रक आणि इर्टीगा कार चा भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

January 3, 2025

ताज्या घडामोडी

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १७ जण गंभीर जखमी

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १७ जण गंभीर जखमी

July 30, 2026
पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पक्ष बदलला, पण उद्धव ठाकरेंप्रती आदर कायम; खासदार ओमराजेंकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

July 27, 2026
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज धाराशिव दौऱ्यावर; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०’ उपक्रमाचा होणार शुभारंभ

July 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group